Search This Blog

Monday, April 23, 2018

654 ग्रामपंचायतींसाठी 27 मे रोजी मतदान


654 ग्रामपंचायतींसाठी
27 मे रोजी मतदान
4,771 रिक्तपदांसाठीही मतदान
मुंबई, दि. 23: राज्यातील विविध 25 जिल्ह्यांमधील 654 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि 33 जिल्ह्यांतील सुमारे 2 हजार 812 ग्रामपंचायतींमधील 4 हजार 771 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 27 मे 2018 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे.
आयोगाच्या प्रसिद्धिपत्राकात म्हटले आहे की, यात सदस्यपदांबरोबरच सरपंचपदाच्या थेट निवडणुकांचाही समावेश आहे. ग्रामपंचायतींच्या या निवडणुकांसाठी 7 ते 12 मे 2018 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारले जातील. त्यांची छाननी 14 मे 2018 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 16 मे 2018 पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी चिन्ह वाटप होईल. मतदान 27 मे 2018 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी मात्र सकाळी 7.30 पासून दुपारी केवळ 3.00 पर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 28 मे 2018 रोजी होईल.
सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या: ठाणे- 5, पालघर- 3, रायगड- 187, सिंधुदुर्ग- 2, नाशिक- 20, धुळे- 7, जळगाव- 8, अहमदगनर- 77, पुणे- 90, सोलापूर- 3, सातारा- 23, सांगली- 82, कोल्हापूर- 74, औरंगाबाद- 4, बीड- 2, नांदेड- 7, परभणी- 1, उस्मानाबाद- 3, लातूर- 5, अकोला- 2, यवतमाळ- 29, वर्धा- 14, भंडारा- 4 आणि गडचिरोली- 2. एकूण- 654.
पोटनिवडणूक होणाऱ्या रिक्तपदांची जिल्हानिहाय संख्या (कंसात ग्रामपंचायतींची संख्या): ठाणे (90)- 167, पालघर (73)- 144, रायगड (93)- 158, रत्नगिरी (202)- 299, सिंधुदुर्ग (74)- 104, नाशिक (200)- 318, धुळे (34)- 49, जळगाव (57)- 96, नंदुरबार (32)- 36, अहमदगनर (78)- 124, पुणे (258)- 456, सोलापूर (93)- 154, सातारा (409)- 777, सांगली (40)- 81, कोल्हापूर (87)- 126, औरंगाबाद (34)- 41, बीड (24)- 35, नांदेड (106)- 177, परभणी (28)- 40, उस्मानाबाद (48)- 65, जालना (21)- 28, लातूर (79)- 94, हिंगोली (41)- 55, अमरावती (80)- 121, अकोला (23)- 31, यवतमाळ (110)- 167, वाशीम (20)- 23, बुलडाणा (39)- 72, वर्धा (49)- 72, चंद्रपूर (74)- 106, भंडारा (6)- 48, गोंदिया (35)- 43  आणि गडचिरोली (175)- 464. एकूण (2,812)- 4,771.

Thursday, April 12, 2018

नगरपरिषद निवडणूक निकाल १२ एप्रिल 2018


गुहागर आणि देवरूखमध्ये सरासरी 78 टक्के मतदान (मतदानाचा दिनांक 11 एप्रिल 2018)


गुहागर आणि देवरूखमध्ये
सरासरी 78 टक्के मतदान
मुंबई, दि. 11: गुहागर व देवरूख (जि. रत्नागिरी) नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सरासरी 77.91 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे; तसेच कणकवली (जि. सिंधुदुर्ग) नगरपंचायतीच्या आणि जामनेर (जि. जळगाव) नगरपरिषदेच्या प्रत्येक एका प्रभागात अनुक्रमे 79.41 व 68.17 टक्के मतदान झाले, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, गुहागर आणि देवरूख नगरपंचायतींच्या सदस्यपदांच्या प्रत्येकी 17 आणि अध्यक्षपदाच्या जागांसाठी ही निवडणूक झाली. गुहागरमध्ये 81.72, तर देवरुखमध्ये 75.65  टक्के मतदान झाले. त्याचबरोबर कणकवली नगरपंचायतीच्या प्रभाग क्र.10 आणि जामनेर नगरपरिषदेच्या प्रभाग क्र.7 मधील सदस्य आणि अध्यक्षपदासाठीदेखील आज मतदान झाले. या दोन्ही ठिकाणच्या इतर प्रभागातील मतदान 6 एप्रिल 2018 रोजी पार पडले होते. त्याचबरोबर आजरा (जि. कोल्हापूर) नगरपंचायत आणि वैजापूर (जि. औरंगाबाद) नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी; तसेच विविध ठिकाणच्या 7 रिक्तपदांकरितादेखील 6 एप्रिल 2018 रोजी मतदान झाले होते. या सर्व ठिकाणी उद्या (ता. 12) मतमोजणी होणार आहे.

Friday, April 6, 2018

नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी सरासरी 72.21 टक्के मतदान


नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी
सरासरी 72.21 टक्के मतदान
मुंबई, दि. 6: कणकवली (जि. सिंधुदुर्ग) व आजरा (जि. कोल्हापूर) नगरपंचायत; तसेच जामनेर (जि. जळगाव) व वैजापूर (जि. औरंगाबाद) नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज सरासरी 72.21 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने 5 मार्च 2018 रोजी 6 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता; परंतु न्यायालयीन निकालाच्या अनुषंगाने या कार्यक्रमात बदल करण्यात आला होता. त्यानुसार गुहागर व देवरूख नगरपंचायतींसाठी 11 एप्रिल 2018 रोजी मतदान होणार आहे. त्याचबरोबर कणकवली नगरपंचायतीतील प्रभाग क्र. 10 मध्ये सदस्य व अध्यक्षपदासाठी; तसेच जामनेर नगरपरिषदेच्या प्रभाग क्र. 7 मध्ये सदस्य व अध्यक्षपदासाठी 11 एप्रिल 2018 रोजी मतदान होईल. उर्वरीत ठिकाणी आज मतदान झाले; तसेच इतर विविध ठिकाणच्या 7 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील आज मतदान झाले. मतमोजणी मात्र सर्व ठिकाणी 12 एप्रिल 2018 रोजी होणार आहे.
नगरपरिषद/ नगरपंचायतनिहाय झालेले सरासरी मतदान असे: कणकवली- 76.97, आजरा- 82.11, जामनेर- 70.92 आणि वैजापूर- 68.79. एकूण-
नगरपरिषद/ नगरपंचायतींच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी झालेले सरासरी मतदान (कंसात प्रभाग क्र):  रत्नागिरी (3ब)- 57.21, आळंदी (1अ)- 65.53, तासगाव (6अ)- 59.70, दुधनी (4ब)- 70.61, सावदा (3ब)- 65.17, कुंडलवाडी (5ब)- 73.69 व कळंब (4)-  80.54. एकूण- 64.57.

महानगरपालिकांमधील 6 रिक्तपदासांठी 45.54 मतदान


विविध महानगरपालिकांमधील
6 रिक्तपदासांठी 45.54 मतदान
‘बृहन्मुंबई’त 40 टक्के मतदान
मुंबई, दि. 6: बृहन्मुंबई महानगरपालिकेसह सहा महानगरपालिकांमधील प्रत्येकी एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी आज सरासरी 45.54 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एका जागेसाठीच्या 40.09 टक्के मतदानाचा समावेश आहे.
महानगरपालिकानिहाय पोटनिवडणुकीत झालेले मतदान (कंसात प्रभाग क्र): बृहन्मुंबई (173)- 40.09, नाशिक (13-क)- 39.71, सोलापूर (14-क)- 45.60,  पुणे- (22-क) 35, अहमदनगर- (32-ब)- 74.56 आणि  उल्हासनगर (17-ब)- 38.30. या सर्व ठिकाणी मतमोजणी उद्या (ता. 7) सकाळी 10 वाजता सुरू होईल.

जि.प. व पं.स.मधील रिक्तपदांसाठी 60 टक्के मतदान


जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील
रिक्तपदांसाठी सरासरी 60 टक्के मतदान
मुंबई, दि. 6: वर्धा व उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या प्रत्येकी एका रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी आणि विविध 11 पंचायत समित्यांच्या निर्वाचक गणांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांकरिता आज सरासरी 60 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
       जिल्हा परिषदेच्या निवडणूक विभागात झालेले मतदान: हमदापूर (ता. सेलू, जि. वर्धा)- 65 आणि आनाळा (ता. परंडा, जि. उस्मानाबाद)- 54.
       पंचायत समितीच्या निर्वाचक गणात झालेले मतदान: पिंगुळी (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग)- 53.29, नगाव (ता. जि. धुळे)- 47.56, तुर्काबाद (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद)- 44.55, संवदगाव (ता. वैजापूर, जि. औरंगाबाद)- 59.23, सगरोळी (ता. बिलोली, जि. नांदेड)- 56.59, मारतळा (ता. लोहा, जि. नांदेड)- 74, काटी (ता, तुळजापूर, जि. उस्मानाबाद)- 56.21, सौंदड (ता. सडक-अर्जुनी, जि. गोंदिया)-58.94, आजंती (ता. हिंगणघाट, जि. वर्धा)- 65.27, घुग्घुस-2 (ता. जि. चंद्रपूर)- 37.80 आणि मानापूर (ता. आरमोरी, जि. गडचिरोली)- 67.05. एकूण- 60. या सर्व ठिकाणी उद्या (ता. 7) मतमोजणी होईल.

Thursday, April 5, 2018

जि.प. व पं.स.मधील रिक्तपदांसाठी आज मतदान


जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील
रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी आज मतदान
मुंबई, दि. 5: वर्धा व उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या प्रत्येकी एका रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी आणि विविध 11 पंचायत समित्यांच्या निर्वाचक गणांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांकरिता उद्या (ता. 6) मतदान होत आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, या सर्व ठिकाणी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. उद्या सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 7 एप्रिल 2018 रोजी होईल.
       जिल्हा परिषद- पोटनिवडणूक होणारे निवडणूक विभाग: हमदापूर (ता. सेलू, जि. वर्धा) आणि आनाळा (ता. परंडा, जि. उस्मानाबाद).
       पंचायत समिती- पोटनिवडणूक होणारे निर्वाचक गण: पिंगुळी (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग), नगाव (ता. जि. धुळे), तुर्काबाद (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद), संवदगाव (ता. वैजापूर, जि. औरंगाबाद), सगरोळी (ता. बिलोली, जि. नांदेड), मारतळा (ता. लोहा, जि. नांदेड), काटी (ता, तुळजापूर, जि. उस्मानाबाद), सौंदड (ता. सडक-अर्जुनी, जि. गोंदिया), आजंती (ता. हिंगणघाट, जि. वर्धा), घुग्घुस-2 (ता. जि. चंद्रपूर) आणि मानापूर (ता. आरमोरी, जि. गडचिरोली).

नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी आज मतदान



नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी आज मतदान
सर्व ठिकाणी 12 एप्रिलला मतमोजणी
मुंबई, दि. 5: कणकवली (जि. सिंधुदुर्ग) व आजरा (जि. कोल्हापूर) नगरपंचायत; तसेच जामनेर (जि. जळगाव) व वैजापूर (जि. औरंगाबाद) नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या (ता. 6) होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. मतमोजणी मात्र 12 एप्रिल 2018 रोजी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने 5 मार्च 2018 रोजी 6 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार गुहागर, देवरूख (जि. रत्नागिरी),कणकवली (जि. सिंधुदुर्ग), आजरा (जि. कोल्हापूर), जामनेर (जि. जळगाव) व वैजापूर (जि. औरंगाबाद) या नगरपरिषदा/ नगरपंचायतींसाठी 6 एप्रिल 2018 रोजी मतदान व 7 एप्रिल 2018 रोजी मतमोजणी होणार होती; परंतु न्यायालयीन निकालाच्या अनुषंगाने या कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे गुहागर व देवरूख नगरपंचायतींसाठी 11 एप्रिल 2018 रोजी मतदान होईल. त्याचबरोबर कणकवली नगरपंचायतीतील प्रभाग क्र. 10 मध्ये सदस्य व अध्यक्षपदासाठी; तसेच जामनेर नगरपरिषदेच्या प्रभाग क्र.7 मध्ये सदस्य व अध्यक्षपदासाठी 11 एप्रिल 2018 रोजी मतदान होईल. उर्वरीत सर्व ठिकाणी उद्या (ता. 6) मतदान होत आहे.
निवडणूक कार्यक्रमातील बदलानुसार 11 एप्रिल 2018 रोजी होणाऱ्या मतदानावर प्रभाव पडू नये म्हणून या सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांची संपूर्ण मतमोजणी 12 एप्रिल 2018 रोजी होईल. रत्नागिरी, आळंदी, तासगाव, दुधनी, सावदा, कुंडलवाडी व कळंब या नगरपरिषदा/ नगरपंचायतींतील प्रत्येकी एका रिक्तपदासाठीदेखील उद्या (ता. 6) मतदान होत आहे. यांची मतमोजणीही 12 एप्रिल 2018 रोजी होईल, असेही श्री. सहारिया यांनी सांगितले.
नगरपरिषद/ नगरपंचायतनिहाय एकूण जागा आणि सदस्य व अध्यक्षपदाच्या उमेदवारांची संख्या: गुहागर (17)- 47, अध्यक्ष- 3, देवरूख (17)- 62, अध्यक्ष- 5, कणकवली (17)- 59, अध्यक्ष- 4, आजरा (17)- 70, अध्यक्ष- 3, जामनेर (24)- 57, अध्यक्ष- 2 आणि वैजापूर (23)- 54, अध्यक्ष- 5.

विविध महानगरपालिकांमधील 6 रिक्तपदासांठी आज मतदान

विविध महानगरपालिकांमधील
6 रिक्तपदासांठी आज मतदान
‘बृहन्मुंबई’च्या एका जागेचा समावेश
मुंबई, दि. 5: बृहन्मुंबई महानगरपालिकेसह सहा महानगरपालिकांमधील प्रत्येकी एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी उद्या (ता. 6) मतदान होत असून 7 एप्रिल 2018 रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, बृहन्मुंबई, नाशिक, सोलापूर, पुणे, अहमदनगर व उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रत्येकी एका रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी उद्या (ता.6) सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 7 एप्रिल 2018 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल.
महानगरपालिकानिहाय पोटनिवडणूक होत असलेल्या प्रभागाचे नाव व उमेदवारांची संख्या: बृहन्मुंबई (173)- 3,  नाशिक (13-क)- 8  सोलापूर (14-क)- 9,  पुणे- (22-क) 5, अहमदनगर- (32-ब)- 3 आणि उल्हासनगर (17-ब)- 4.

Tuesday, April 3, 2018

ग्रामपंचायतींच्या मतदार याद्यांची 18 एप्रिल रोजी प्रसिद्धी


ग्रामपंचायतींच्या प्रारूप मतदार याद्यांची
18 एप्रिल रोजी प्रसिद्धी
मुंबई, दि. 3: विविध जिल्ह्यांतील जून 2018 ते सप्टेंबर 2018 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नवनिर्मित सुमारे 670 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तसेच रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 18 एप्रिल 2018 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, विधानसभा मतदार संघाच्या 10 जानेवारी 2018 रोजी अस्तित्वात आलेल्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्याआधारावर ग्रामपंचायतींच्या प्रारूप मतदार याद्या 18 एप्रिल 2018 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. त्यावर 18 ते 23 एप्रिल 2018 या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील. अंतिम मतदार याद्या 25 एप्रिल 2018 रोजी प्रसिद्ध होतील.

देवरूख आणि गुहागरमध्ये 6 ऐवजी 11 एप्रिलला मतदान


देवरूख आणि गुहागरमध्ये
6 ऐवजी 11 एप्रिलला मतदान
मुंबई, दि. 3: रत्नागिरी जिल्ह्यातील देवरूख व गुहागर नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमात न्यायालयीन निकालानंतर बदल करण्यात आला असून आता 6 ऐवजी 11 एप्रिल 2018 रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार देवरूख आणि गुहागर नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या व अध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीसाठी 6 एप्रिल 2018 रोजी मतदान होणार होते; परंतु नामनिर्देशनपत्रांच्या छाननीअंती काही उमेदवारांनी संबंधित जिल्हा न्यायालयात अपील दाखल केली होती. या अपिलांवर 29 मार्च 2018 पर्यंत निकाल आले. त्या अनुषंगाने निवडणूक कार्यक्रमात बदल करणे आवश्यक झाल्याने निवडणूक कार्यक्रमात बदल करण्यात येत आहे. त्यामुळे आता या दोन्ही ठिकाणी 11 एप्रिल 2018 रोजी मतदान होईल. मतमोजणी 12 एप्रिल 2018 रोजी होईल.
कणकवली व जामनेरमध्ये अंशत: बदल
कणकवली (जि. सिंधुदुर्ग) नगरपंचायत आणि जामनेर (जि. जळगाव) नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार 6 एप्रिल 2018 रोजी मतदान होत आहे; परंतु या कार्यक्रमातही न्यायालयाच्या निकालाच्या अनुषंगाने अंशत: बदल करण्यात आला आहे. या बदलानुसार कणकवली नगरपंचायतीतील प्रभाग क्र.10 मध्ये सदस्य व अध्यक्षपदासाठी; तसेच जामनेर नगरपरिषदेच्या प्रभाग क्र.7 मध्ये सदस्य व अध्यक्षपदासाठी 11 एप्रिल 2018 रोजी मतदान होईल. कणकवली नगरपंचायत आणि जामनेर नगरपरिषदेच्या निवडणुकीची संपूर्ण मतमोजणी 12 एप्रिल 2018 रोजी होईल.